बल्गेरिया : बल्गेरियात राहणारे अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी 6 भविष्यवाण्य़ा केल्या होत्या. यामधील आतापर्यंत दोन भविष्यवाण्य़ा खऱ्या ठरल्या आहेत. तर आता तिसऱी भविष्यवाणी देखील खरी ठऱण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. कारण या देशात एलियन्स दिसून आले आहेत.या संबंधित व्हिडिओ फुटेज देखील समोर आले आहे. मात्र ते खरेच एलियन्स आहेत का याची चाचपणी सुरु आहे.
बाबा वेंगा हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ते आहेत. असे म्हणतात की दृष्टी नसतानाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येतं. आतापर्यत त्यांच्या 2 भविष्यवाण्य़ा खऱ्या ठरल्या आहेत. तर त्यांच्या आणखीण 4 भविष्यवाण्य़ा खऱ्या व्हायच्या बाकी आहेत.
तिसरी भविष्यवाणी काय?
बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत सांगितले आहे की, 2022 मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह एलियनद्वारे पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर हे एलियन पृथ्वीवरील लोकांवर हल्ला करू शकतात.
एलियन्स पाहिल्याचा दावा
एलियन्स पृथ्वीवर येतील हा त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे. कारण अमेरीकेच्या डग्लस विंडसर मॅकइल्होन या व्यक्तीने एलियन्स पाहिल्याचा दावा केला आहे. या संबंधित व्हिडिओ पुरावे त्याने समोर आणले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एलियन्स फिरताना दिसत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
एलियन्स पाहणारा व्यक्ती काय म्हणाला?
डग्लस विंडसर मॅकइल्होन म्हणाला की, हा प्राणी खूप विचित्र होता आणि गुडघ्यावर चालत होता. तो दिसायला बटू आणि अतिशय पातळ एलियन्स सारखा दिसत होता. पण त्याचे शरीर काहीसे माणसासारखे होते. तो पुढे म्हणाला की, अमेरिकेच्या केंटकी राज्यातील मूरहेड येथे ही घटना घडली आहे.
CCTV shows 'bony alien' walking around cottage in woods like Gollum in Lord of the Rings pic.twitter.com/zCQrm7xSdD
— Love Gaur (@lovegaur3) July 16, 2022
भविष्यवाणी खरी ठरली आहे का?
दरम्यान अमेरीकेतल्या व्यक्तीने एलिय़न्स पाहिल्याच्या घटनेचा संदर्भ बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी केला जात असल्याची माहिती मिळत आहे. बाबा वेंगा यांनी केलेली ही ती भविष्यवाणी खरी ठरताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप तरी अमेरीकेत व्हिडिओत दिसणारा व्यक्ती हा एलियन्सच आहे याची खात्री झाली नाही आहे. तसेच या एलियन्सने कोणत्य़ाही प्रकरचा हल्ला केला नाही आहे. त्यामुळे अजूनही तरी बाबा वेंगा याची भविष्यवाणी खरी ठरली नाही आहे, असे म्हणता येईल.