प्रयागराज : कोरोनाची लस (Corona Vaccine) नको, म्हणून लस घेताना रडणारे, लस देणाऱ्याला शिव्या देणारे असे अनेक व्हीडिओ तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. पण या बातमीत लस नको म्हणून जी झटापट आहे ती आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक झटापट आहे. हा व्हीडिओ पाहताना तुम्हाला हसू तर आवरणार नाही, पण पुन्हा पुन्हा हा व्हीडिओ पाहावासा नक्की वाटेल. (boatman in ballia district of uttar pradesh refused to take corona vaccine and manhandled with a health care worker video viral on social media)
काहींना कोरोनाची लस ही आजारापेक्षा इलाज भयंकर अशीच वाटते की काय, म्हणून ते प्रखर विरोध करताना दिसतात. कोरोना लस घेणे तसे बंधनकारक नाही, पण संपूर्ण लोकांनी ही लस घेतली तर मोठ्या प्रमाणात ही लाट थोपवण्यास मदत होवू शकते असं आपण म्हणतो.
रेवती नदीतला हा व्हीडिओ आहे, नावाड्याला आरोग्य कर्मचारी लस घेतली नाही, म्हणून लस घेण्याची विनंती करतो, त्याला खाली बोलवतो, पण तो नाही घेणार, नाही घेणार असं म्हणत जोर जोराने विरोध करतो. तरीही हा आरोग्य कर्मचारी हटत नाही. हे पाहिल्यावर तो नावेतून उडी मारुन खाली येतो.
आरोग्य कर्मचाऱ्याला पहेलवानाने डाव साधून खाली पाडावं, तसं खाली पाडतो, एवढंच नाही, तो त्याचे दोन्ही पाय ओढतो, एकदा तर असं वाटत की, नावाड्या या आरोग्य कर्मचाऱ्याला नदीत ओढतो की काय, हा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.