Money Laundering Case: सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये (Money Laundering Case) अडकलेल्या बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस (Nora Fatehi and Jackline Fernandes) यांची ईडीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे सध्या या दोघांची तासनतास चौकशी होताना दिसते आहे. अशावेळी आता नोरा फतेहीनं आपलं वक्तव्य कॉर्टात नोंदवलं आहे. सध्या या वक्तव्यातून काय समोर येणार हे आता लवकरच बाहेर येऊ शकतं. सुकेश चंद्रशेखरचे कारनामे आता जगासमोर आले आहेत. त्यातून ईडीतर्फे जॅकलिन आणि नोराचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये (Bollywood) सुरू असणारे हे प्रकार याच कलाकारांच्या चाहत्यांसमोर येते आहे. समोर आलेल्या महितीनुसार, पाटियाला हायकॉर्टात नोरानं आपलं स्टेटमेट दाखल केलं आहे. एएनआयनं तिचा एक व्हिडीओही ट्विट केला आहे. ज्यात ती आपलं स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर कॉर्टाबाहेर पडताना दिसते आहे. (Bollywood actress nora fatehi records her statement on money laundering case sukesh chandrashekhar)
नोरा ही स्वत: दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गेली होती. तिला पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्याची विनंती करण्यात आली. त्यावर तिनं आपला जबाब नोंदवला आहे. यापुर्वी नोराचीही अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुकेश बॉलिवूड (Sukesh Chandrashekar) अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू आणि लक्झरी वस्तू द्यायचा. लॉंडरिंग अॅक्ट 2002 च्या कलम 50(2) आणि 50(3) अंतर्गत सुकेशविरुद्ध नोराचे बयान नोंदवण्यात आले. या प्रकरणात जॅकलिननं परदेशात जाण्याची याचिका केली होती जी न्यायालयानं फेटाळून लावली होती.
नोरा आणि जॅकलिन अनेक गोष्टींचे आमिष दाखवतं त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना महागड्या वस्तू दिल्या होत्या अशा वस्तू तर सामान्यांच काय श्रीमंत लोकांनाही परवडल्या नसत्या अशीच अतिशयोक्ती केली तरी वावगं ठरणार नाही. सध्या असे प्रकार हे बऱ्याच घडताना दिसत आहेत. त्यातून अशावेळी मात्र नोरा आणि जॅकलिनमुळे मोठ मोठ्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. सध्या नोरा आणि जॅकलिनची टप्प्याटप्प्यानं चौकशी सूरू आहे. सुकेश चंद्रशेखरविरूद्ध पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात ईडी (ED) आहे.
हेही वाचा - RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...
चौकशीदरम्यान, नोराने खुलासा केला की, सुकेश चंद्रशेखरने नोराचा मेव्हणा बॉबीला सुमारे 65 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती. नोरा, सुकेश चंद्रशेखरच्या पत्नीच्या समारंभाला चेन्नईमध्ये बनवलेल्या स्टुडिओमध्ये गेस्ट म्हणून गेली होती.
#WATCH | Delhi: Actor-dancer Nora Fatehi leaves from Patiala House Court in Delhi. She appeared before the Court and gave a statement before magistrate to assist the investigation of Rs 200 Crore money laundering case linked to conman Sukesh Chandrasekhar. pic.twitter.com/KVL9A7txEr
— ANI (@ANI) January 13, 2023
सुकेशने नोराला BMW सारखी आलिशान कार भेट दिली. ती त्याच्यासोबत व्हॉट्सअपवरूनही संपर्क साधायची परंतु नंतर तो तिला त्रास देत असल्यानं तिनं त्याच्याशी संपर्क तोडला होता.