मुंबई : शेअर बाजार आपल्या रेकॉर्ड हायच्या जवळ ट्रेड करीत आहे. बाजाराच्या हाय वॅल्युएशनमध्ये अनेक शेअर्सने आपला 1 वर्षाच्या उच्चांकीवर आहेत. गुंतवणूकदारांना मार्केट करेक्शनची देखील भीती आहे. अशातच गुंतवणूकीसाठी अशा शेअर्सवर नजर ठेवा जे ब्रोकरेज हाऊसेसच्या लिस्टमध्ये सामिल आहेत. कोणत्याही शेअरचमध्ये तेजी किंवा घसरण का होत आहे. यावर संशोधन करून ते स्टॉकबाबत आपले मत तयार करतात. ब्रोकरेज हाऊसने आपल्या पसंतीच्या काही अशा शेअर्सची ताजी लिस्ट दिली आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. या शेअर्समध्ये Vedanta, Tata Steel, Titan, Au small finance Bank आणि Tata steel सामिल आहे.
Vedanta
या शेअरमध्ये ब्रोकरेज हाऊस Citi ने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर साठी 365 रुपयांचे टार्गेट दिले आहे. बुधवारी शेअर 298 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीने 18.5 रुपये प्रति शेअर इंटरिम डिविडेंड देण्याचीही घोषणा केली होती.
Eicher Motors
Eicher Motors या शेअर्सची ब्रोकरेज हाऊस नोमुराने विक्रीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 2374 रुपयांचे लक्ष दिले आहे. सध्या शेअर 2704 रुपयांवर ट्रेड करीत आहे.
Maruti
देशातील दिग्गज ऑटो कंपनीमध्ये ब्रोकरेज हाऊस मॅक्कारीने न्यूट्रल रेटींग दिली आहे. शेअरसाठी 6800 रुपयांचे लक्ष दिले आहे. काल हा शेअर 6785 रुपयांवर बंद झाला आहे.
TITAN
या शेअर्ससाठी ब्रोकरेज हाऊस मॅक्कारीने आऊटपरफॉर्म रेटिंग दिली आहे. त्यासाठी 2150 रुपयांचे लक्ष दिले आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, टायटनमध्ये अद्यापही स्ट्रक्चरल ग्रोथ दिसून येत आहे.
AU Small Finance Bank
या शेअर्समध्ये ब्रोकरेज हाऊस Citiने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी 1500 रुपयांचे लक्ष दिले आहे.
Tata Steel
टाटा स्टीलसाठी ब्रोकरेज हाऊस USB खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 1800 रुपयांचे लक्ष ठेवले आहे.