नवी दिल्ली : बसपा प्रमुख मायावती यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राज्यसभेत मला बोलू दिलं जात नाही, अशी कैफियत मायावती यांनी मांडली होती. यानंतर मायावती यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मायावती यांना सहारनपूर हिंसेच्या घटनेवर बोलायचे होते. मायावती यांनी सत्ताधारींवर बोलू न देण्याचा आऱोप लावला होता.
राजीनाम्या संदर्भात मायावती दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतींना भेटल्या, त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करून घेण्यात आला. याआधी मायावतींचा राजीनामा हा तीन पानी असल्याने, तो उपराष्ट्रपतींनी स्वीकारला नव्हता. यानंतर मायावतींना एका ओळीत आपला राजीनामा दिला तो स्वीकारण्यात आला.