नवी दिल्ली : EPFO खातेधारकांना पैशांची गरज असेल तर फक्त 1 तासात आपण आपल्या PF अकाऊंटमधून पैसे काढू शकतील. कोरोनाच्या संकट काळात लोकांना पैशांची गरज आहे. अशातच EPFO ने आपल्या खातेधारकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही आपल्या PF मधून 1 लाख रुपये आगाऊ काढू शकता. जाणून घेऊ या पूर्ण प्रक्रिया
मेडिकल खर्चसाठी मिळतील पैसे
कोरोना काळात जर तुम्हाला मेडिकल खर्चासाठी अचानक पैशांची गरज पडली तर, तुम्ही या सेवेचा फायदा घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला खर्च दाखवावा लागेल.
1 लाख रुपयांपर्यंतचा मेडिकल एडवान्स
EPFO ने एक सर्कुलर जारी केले आहे. कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत मेडिकल एडवांस काढण्याची परवानगी असणार आहे. कोरोना विषाणू किंवा अन्य आजारपणामुळे रुग्णालयात दाखल कारवे लागल्यास PF चा पैसा काढता येतो.
कसे निघतील पैसे?
आधीसुद्धा EPFO तून मेडिकल इमरजेंसीच्या वेळी पैसे काढता येत होते. परंतु यासाठी तुम्हाला मेडिकल बिल आधी जमा करावे लागत होते. त्यानंतर तुम्हाला एडवांस मिळत असेत. नविन नियमांनुसार एडवांस बिल जमा करण्याची गरज नसणार आहे. तुम्हाला फक्त अप्लाय करावे लागेल. आणि पैसे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर होतील.
पूर्ण प्रक्रिया वाचा
1 पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्ही सर्वात आधी www.epfindia.in वेबसाईटच्या होमपेजला भेट द्या
2 आता COVID टॅब अंतर्गत वर डावीकडे ऑनलाईन एडवांस क्लेमवर क्लिक करा.
3 आता आपल्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक नमूद करा. आणि कन्फर्म करा
4 यानंतर प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेमवर क्लिक करा.
5 आता ड्रॉप डाऊनवरून PF Advance क्लिक करा. (Form 31)
6 यानंतर तुम्ही तुमच्या कारणाची निवड करा
7 आता तुम्हाला जेवढी रक्कम काढायची असेल ते नमूद करा. आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि आपला पत्ता नमूद करा
8 यानंतर Get Aadhar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाइलवर आलेला OTP नमूद करा.
9 आता आपला क्लेम फाइल होईल