मुंबई : शेअर बाजार मागील वर्षात चांगले प्रदर्शन करीत आहे. बाजारातील तेजीमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे. या दरम्यान फार्मा कंपन्यांचे शेअर्समध्ये देखील चांगली तेजी नोंदवली गेली. असाच एक शेअर आहे सन फार्मा! या शेअरने मागील वर्षभरात गुंतवणूकदारांना 65 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. हा शेअर पुढे देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने सन फार्माच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
ब्रोकरेज फर्मचा सल्ला
सन फार्माच्या शेअर्सची खरेदी करून त्यासाठी 960 रुपयांचे लक्ष मोतीलाल ओस्वालने दिले आहे. 14 ऑक्टोबर रोजी सन फार्माच्या शेअरची प्राइज 841 च्या आसपास होती. त्यामुळे सध्याच्या प्राइजवरून सन फार्माच्या शेअर्सची खरेदी केल्यास येत्या काही महिन्यात 13 टक्क्यांचा रिटर्न सहज मिळवता येऊ शकतो. मागील एका वर्षात सन फार्माचा शेअरने 65.82 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. तसेच आतापर्यंत शेअरचा किंमतीत 39.92 टक्क्यांची तेजी नोंदवली गेली आहे.
इतर कारणे
ब्रोकरेज हाउस रिपोर्टच्या मते, ग्लोबल स्पेशियलिटी पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूकीतून कंपनीला फायदा होणार आहे. ब्रॅंडेड जेनेरिक सेगमेंटमध्ये रिवाइवलचा कंपनीच्या बिझनेसवर सकारात्मक परिणाम झाला आहे.