३६९५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी विक्रम कोठारीला अटक

सीबीआयने गुरूवारी सायंकाळी रोमोटोमॅक कंपनीचा मालल विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी याला अटक केली. 

Updated: Feb 22, 2018, 10:50 PM IST
३६९५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी विक्रम कोठारीला अटक title=

नवी दिल्ली : सीबीआयने गुरूवारी सायंकाळी रोमोटोमॅक कंपनीचा मालल विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी याला अटक केली. कोठीरी पिता-पूत्रांनी सात राष्ट्रीय बॅंकांकडून घेतलेले ३, ६९५ कोटी रूपयांचं कर्ज न चुकल्याने अटक करण्यात आली आहे. 

मुलगा आणि पत्नी व्यवस्थापक

सीबीआय अधिका-यांनी सांगितले की, कोठारी आणि त्याचा मुलाला एजन्सीने दिल्लीला बोलवलं होत. अधिकारी म्हणाले होते की. कोठारी, त्याची पत्नी साधना आणि मुलगा राहुल सर्वच रोटोमॅल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी कथित रूपात कर्जाने घेतलेली रक्कम दुसरीकडे गुंतवली. ते म्हणाले की, सात राष्ट्रीय बॅंकांच्या समूहामधील एक बॅंक बदोडाने सीबीआयला कोठारी विरोधात एफआयआर दाखल करण्यास सांगितले होते. कारण त्यांना भीती होती की, कोठारी देश सोडून पळेल. 

१८ फेब्रुवारीला दाखल केली तक्रार

तक्रार मिळाल्यावर सीबीआयने १८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला. सुरूवातीला असे वाटले होते की, हा घोटाळा ८०० कोटी रूपयांचा आहे. पण सीबीआयने जेव्हा रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेटा लिमिटेडच्या खात्यांची चौकशी केली तेव्हा खुलासा झाली की, कंपनीने कथित रूपायेन बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बॅंक, यूनियन बॅंक ऑफ इंडिया, इलाहाबाद बॅंक आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सकडून कर्ज घेतले. 

सीबीआयचा आरोप

सीबीआयने आरोप लावला आहे की, आरोपींनी सात बॅंकांकडून २, ९१९ कोटी रूपयांची रक्कम कर्जाच्या रूपात घेऊन फसवणूक केलीये. व्याजाची रक्कम आणि देणा-यांची रक्कम धरून कंपनीकडून ३, ६९५ कोटी रूपये घेणे आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर ते देश सोडून जाऊ नये म्हणून तसे आदेश देण्यात आले होते.