नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१८मध्ये कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात २१ हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजार रुपये आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेत २६ हजार रुपये असावे अशी मागणी कर्मचारी संघटनाकडून केली गेली होती. मात्र अर्थ मंत्रालयातील कमिटी तसेच कर्मचारी संघटनेमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान बेसिक २१ हजार रुपये करण्यावर सहमती झाली.
याआधी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात सात हजार रुपयांची वाढ होत ते १८ हजार रुपये करण्यात आली होती. तर कमाल वेतनात ८० हजार रुपयांनी वाढ करुन ती २.२५ लाख रुपये करण्यात आली होती.