बस तिकीटाच्या पैशांमध्ये बुक करा विमानाचं तिकीट, 'या' कंपनीची प्रवाशांना जबरदस्त ऑफर

स्वस्तात विमान तिकीट बुक करण्याची संधी दिली आहे.

Updated: Aug 10, 2022, 02:35 PM IST
बस तिकीटाच्या पैशांमध्ये बुक करा विमानाचं तिकीट, 'या' कंपनीची प्रवाशांना जबरदस्त ऑफर title=
cheap flight tickets independence day sale 2022 check here all details in marathi

Independence Day sale 2022 - भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. यंदा आपण  भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे भारतात हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियान राबवलं जातं आहे. यानिमित्ताने अनेका Independence Day saleची घोषणा केली आहे. अशातच Go First ने पण आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. 

GO FIRST स्वस्तात विमान तिकीट बुक करण्याची संधी दिली आहे. चला तर मग जाणून घ्या कधीपर्यंत आहे ही ऑफर आणि कितीपर्यंत मिळेल तिकीट? (cheap flight tickets independence day sale 2022 check here all details in marathi)

GO FIRST ऑफर

1. 10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2022 पर्यंत तिकीट बूक करु शकता.
2. या ऑफरद्वारे तुम्हाला 1 सप्टेंबर ते 13 मार्च 2023 या महिन्यांसाठी अँडव्हास बूक करायची आहे.
3. ही ऑफर सर्व चॅनेलवर एप्लाइ होऊ शकते.
4. या सेलमध्ये तिकिटांचे बुकिंग करण्यास येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे.
5. 1508 रुपयात करा फ्लाइट बुकिंग

यावरून करा तिकीट बूक 

GoFirst च्या अधिकृत वेबसाइट www.FlyGoFirst.com वरुन तुम्ही तिकीट बूक करु शकता. याशिवाय मोबाईल अॅपद्वारेही तिकीट बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे हे तिकीट रिफंडेबल आहे. 

अधिक माहितीसाठी ही लिंक तपासा

या ऑफरबद्दल अजून जाणून घेण्यासाठी  https://www.flygofirst.com/offers-and promotions/independence-day-sale/ या अधिकृत लिंकवर जाऊन माहिती घ्या. या लिंकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.