चेन्नई : लॉकडाऊनचा परिणाम तृतीयपंथींयांवरही होत आहे. लॉकडाऊन असताना अशा दिवसांत त्यांच्याकडे कमावण्याचं कोणतंही साधन नाही. तमिळनाडू, चेन्नई आणि राज्यातील इतर भागात राहणाऱ्या तृतीयपंथींयांसाठी हा अतिशय संकटाचा काळ आहे. पण या अशा संकटकाळातही हे लोक केवळ आपल्या गरजा न भागवता बेघर लोकांचीही मदत करत आहेत.
LGBTIQ कम्युनिटीमधील जयाने सांगितलं की, 'आमच्या कोणाकडेही सेविंग नसतं. आमच्या भविष्यातील गरजांबाबत आम्ही कधी विचार करत नाही. पण आता लॉकडाऊनमुळे कमवण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. मात्र या संकटात अनेक कॉर्पोरेट्स, सामाजिक संस्था आणि काही लोक आमच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.'
'संपूर्ण चेन्नईमध्ये या ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये 2000 सदस्य आहेत. आता आमच्यासोबत इतर गरजूंचीही आम्ही मदत करत आहोत. पोलिसही यात मदत करत आहेत. आम्ही संपूर्ण शहरांत 300पर्यंत गरजेच्या वस्तूंच्या पिशव्यांचं वाटप करतो, त्यात तांदुळ, तेल, डाळ, साबण अशा वस्तू असतात. या वस्तू गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी काही ड्रायव्हरही आमच्यासोबत पुढे आले आहेत.' असं या कम्युनिटीतील जयाने सांगितलं.
सेंट्रल चेन्नईत 2019मध्ये लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या ट्रान्सजेंडर राधाने सांगितलं की, 'पब्लिक डिस्ट्रिब्यूशन सिस्टममधून ज्यांच्याकडे कार्ड आहे, त्यांनांच राशन मिळतं. ट्रान्सजेंडर कम्युनिटीमधील अनेकांकडे कार्ड नाही. मी याबाबत सरकारी अधिकाऱ्यांकडे चर्चा केली. चर्चेनंतर त्यांच्याकडून गरजेच्या वस्तू आणि 1000 रुपये सर्वांना देण्यात आले. ज्यांच्याकडे ट्रान्सजेंडर कार्ड आहे, त्या सर्वांना हे राशन आणि पैसे मिळाले आहेत. त्याशिवाय आम्ही बेघर लोकांचीही मदत करत असल्याचं' राधा यांनी सांगितलं.