Crime News: क्रूरतेचा कळस! तुम सिर्फ मेरी हो....; एका प्रेमकहाणीच्या रक्तरंजित अंतानं पुन्हा हादरला देश

Crime News: तरुणीचा जीव घेत 200 किमी दूर जंगला पेट्रोल टाकून लावली मृतदेहाची विल्हेवाट 

Updated: Dec 2, 2022, 01:18 PM IST
Crime News: क्रूरतेचा कळस! तुम सिर्फ मेरी हो....; एका प्रेमकहाणीच्या रक्तरंजित अंतानं पुन्हा हादरला देश  title=
chhattisgarh crime girl murder crazy lover killed her girlfriend and threw her body in forest crime news marathi

Crime news : (Delhi) दिल्लीतील श्रद्धा वालकर (shradha walkar case) प्रकरणातून देश सावरत नाही, तोच आणखी एका प्रकरणानं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. छत्तीसगढमध्ये घडलेल्या अशाच एका खळबजनक घटनेनं यंत्रणांनाही हादरा दिला आहे. इथं एका माथेफिरु प्रेमीनं प्रेयसीला रायपूरपासून 200 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ओडिशा येथे नेत तिचा जीव घेतला आणि जंगलामध्ये पुरावे नष्ट करण्यासाठी म्हणून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. सदर प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल असून, ओडिशा पोलीस लवकरत यासंदंर्भातील सविस्तर माहिती देणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Chhattisgarh News)

प्रेम नव्हे हा तर अतिरेक.... 

तनू कुर्रे नावाची ही युवती कोरबा जिल्ह्यातील राहणारी होती. रायपूरमधील एका खासगी बँकेत ती नोकरी कर होती. यादरम्यानच तिची ओळख बालंगीरचा व्यावसायिक तरुण सचिन अग्रवाल याच्याशी झाली. ओळख वाढली, मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात रुपांतरित झाली. पण, या प्रेमाचा अंत मात्र अनपेक्षित आणि तितकाच रक्तरंजित झाला.  (Tanu Kurrey Murder Case)

 

हेसुद्धा वाचा : Shrdhha Wallker case : तुरुंगातही आफताब खेळतोय क्रूर 'चाल'; पाहून पोलीसही सुन्न

21 नोव्हेंबरला जेव्हा तरूचा फोन लागत नव्हता. तेव्हा भीतीपोटी तिच्या नातेवाईकांनी पंडरी पोलीस स्थानकात सदर प्रकरणाची तक्रार दाखल केली. बेपत्ता असण्याच्या तक्रारीची कल्पना असूनही सचिननं मात्र तनूच्या कुटुंबाशी बोलणं सुरुच ठेवलं. तनू आणि आपण लग्न करणार असल्याचा विश्वास त्यानं तिच्या कुटुंबीयांना दिला. पण, तिथे मात्र याच सचिननं तनूवर गोळी झाडत तिला संपवलं होतं. तिचा मृतदेह ओळखू येऊ नये यासाठी पेट्रोल टाकून तो जाळला होता. पण, पोलिसांना तिचा मृतदेह सापडला आणि कुटुंबीयांनी तनूची ओळख पटवून दिली. 

रायपूर पोलिसांमुळे प्रकरण उघडकीस 

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार तनू आणि सचिन एकत्रच ओडिशाला गेले होते. फिरवण्याच्या बहाण्यानं त्यानं तिला तिथे नेलं आणि तिथेच तिचा जीव घेतला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर, तनू आपल्याव्यतिरिक्त कोणा दुसऱ्या मुलाच्याही संपर्कात असल्याचं कारण त्यानं पोलिसांना दिलेल्या जबाबात नोंदवलं. दुसऱ्याला डेट करते म्हणून त्यानं तरूवर गोळी झाडली होती. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा देश हादरला आहे. 

श्रद्धा वालकर आणि आता तनू... प्रेमाच्या नावावर होणाऱ्या या घटना पाहता राजकीय हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपांमध्ये रमलेल्या यंत्रणा आणि नेतेमंडळींनीचं या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष नाही का? असाच सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.