पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : बालदिन (children's day) हा दरवर्षी 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. मुलांचे हक्क, शिक्षण आणि कल्याणाविषयी (Children's rights, education and welfare) जागरूकता वाढवण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. मुलांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं मानसिक आरोग्य (mental health). भारतासारख्या विकसनशील राष्ट्रातील तरुण मानसिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडत असतील तर त्याचा त्यांच्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. भारतातील ज्या मुलांना मानसिक आरोग्याचे (Children's mental health) आजार आहेत. ते मुलं कोणतेही मदत किंवा उपचार घेण्यास नाखूश राहत असल्याचं आढळून आलयं. त्यामुळे, आपल्या मुलांची मानसिक काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
मुलांच्या भावना समजून घ्या
तुम्हाला काय वाटतं हे त्यांना सांगण्याऐवजी मुलांना काय वाटतं (What do children think) हे समजून घ्या. त्यांच्या भावना आणि त्यांचे विचार ऐकून (Feelings and their thoughts) घेऊन त्यांना बोलत करा. त्यांच्या आजूबाजूला काय घडतय आणि त्यांना त्या बद्दल काय वाटतय हे जाऊन घेऊन योग्य मार्ग काढा.
मुलांना विश्रांतीची गरज
मुलांना अनेक वेळा शाळा, अभ्यास आणि परीक्षा (School, study and exams)तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. म्हणून, त्यांना विश्रांती (relaxation) देणे महत्वाचे आहे. अशा वेळी तुम्ही त्याच्या जवळ जाऊन मुलांना आराम (Children relax) करण्यासाठी सांगा. अशा वेळी त्यांना त्यांच्या आवडी आणि निवडीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करा. ज्यामध्ये त्यांना अशा वेळी आनंद मिळेल.
मुलांसोबत आपलसं वाटेल असं वागा
तुमचे घर अशी जागा बनवा जिथे तुमच्या मुलाचे स्वागत आणि प्रेम (Welcome and love) वाटेल. मुलांसाठी त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षित वातावरण (Safe environment) तयार करणे महत्त्वाचे आहे. हे मुलाच्या भावनिक स्थिरतेच्या विकासास मदत करते.
तुमच्या मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावार (Health and mental health) आजच्या काळात सोशल मीडियाचा (social media) खूप मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे सोशल मीडिया तुमच्या मुलांना समजून सांगा. आठवड्यातून किमान दोन दिवस तुमच्या मुलासोबत डिजिटल डिटॉक्स (Digital detox) करा.
मुलांना ध्यान आणि योग शिकवा
तुमच्या मुलाला कोणतीही संकट आली तरी त्यांना सामना करण्यासाठी काही कौशल्ये शिकवा. जसे की ध्यान, योग, व्यायाम, जर्नलिंग (Meditation, yoga, exercise, journaling) वगैरे. मुलांना सकारात्मक गोष्टींवर (positive thing) लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगा. मुलांना ध्यान आणि योगा शिकवल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या कणखर आणि मजबूत (Firm and strong) होतील.
मुलाचं सर्व ऐकून घ्या
मुलं तुम्हाला काय सांगतात ते समजून घ्या, ऐकून घ्या. आणि त्याकडे लक्ष द्या. त्यांना काही वाटत असेल तर ते का वाटतं ते कोठून येत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांनी तुमच्यासमोर काही समस्या मांडल्या (Children's problems) तर त्यावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला कितीही लहान किंवा क्षुल्लक वाटत असले तरीही त्यांना येत असलेल्या अडचणीचा स्वीकार (Acceptance of difficulty) करा. असं केल्यानं मुलं प्रत्येक गोष्टी तुमच्याशी शेयर करतील आणि तुमचा संवाद वाढेल.