मुंबई : देशातील अनेक राज्य कोळशाच्या कमतरतेमुळे विजेचं संकट निर्माण होण्याचा दावा करत आहे. मात्र केंद्र सरकारने हा दावा फेटाळून टाकला आहे. त्यामुळे देशात खरंच वीज संकट निर्माण झालं आहे की? विरोधी पक्षाने सरकार विरोधात भ्रम निर्माण केलाय.
केंद्रीय वीज प्राधिकरणाने भारतातील कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्राच्या आताच्या परिस्थितीवर आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील 135 पैकी 115 वीज प्रकल्पांना कोळशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत वीज प्रकल्पांमधील कोळशाच्या स्थितीबाबत प्राधिकरणाने हा अहवाल जारी केला आहे. यावरून असे दिसून येते की, 115 पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा साठा सामान्यपेक्षा कमी आहे.
अहवालानुसार, देशातील 17 पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा एकही दिवस शिल्लक नाही. तर 26 पॉवर प्लांटमध्ये फक्त एका दिवसाचा कोळसा साठा शिल्लक आहे. यापैकी 22 पॉवर प्लांटमध्ये 2 दिवस, 18 प्लांटमध्ये 3 दिवस आणि 13 पॉवर प्लांटमध्ये 4 दिवस कोळसा शिल्लक होता.
त्याचप्रमाणे देशातील 11 पॉवर प्लांटमध्ये 5 दिवसांचा कोळसा साठा शिल्लक होता. 8 पॉवर प्लांटमध्ये फक्त 6 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, देशातील वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यांना वीज पुरवठ्यासाठी आवश्यक साठा आवश्यक आहे.
देशातील कोळशाच्या साठ्याबाबत केंद्राने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. सप्टेंबर महिन्यात कोळसा खाणी भागात मुसळधार पावसामुळे कोळसा उत्पादनावर परिणाम झाला. बाहेरून येणाऱ्या कोळशाच्या किमती लक्षणीय वाढल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला कोळशाचा पुरेसा साठा नव्हता. या कारणांमुळे, व्यवसायाच्या संकटासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका कायम आहे.