नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आज काँग्रेसचं एक प्रतिनिधीनमंडळ श्रीनगरकडे निघालंय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ११ काँग्रेस नेत्यांचं हे प्रतिनिधीमंडळ दिल्ली विमानतळाहून श्रीनगरकडे जाण्यासाठी विमानात दाखल झालंय. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, याची पाहणी प्रत्यक्ष करण्यासाठी काँग्रेसचं हे प्रतिनिधी मंडळ श्रीनगरकडे निघालंय. परंतु, काँग्रेस नेत्यांना श्रीनगरमध्ये प्रवेश न देण्याची तयारी करण्यात आलीय. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांना श्रीनगर विमानतळाहूनच परत धाडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मला माझ्या घरी का जाऊ दिलं जात नाही? आम्ही काही तिथं कायदे तोडण्यासाठी जात नाहीत, असं श्रीनगर रवाना होण्यापूर्वी काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी म्हटलंय.