Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार केला आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 73 जागांवर आणि जेडीएसने 29 जागांवर तर अन्य 5 जणांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसने सरकार स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बंगळुरमध्ये आज येण्यास सांगितले आहे. तसेच काँग्रेसकडून अनेक चार्टर चॉपर विमाने बुक करण्यात आली आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हालचालीवर लक्ष ठेवून आहे. आमदारांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. खरगे कर्नाटक निवडणुकीबाबत मिनिटा-मिनिटाचा अहवाल घेत आहेत. काँग्रेसने निकालानंतर आमदारांना प्रमाणपत्रे घेऊन बेंगळुरुला येण्यास सांगितले आहे. ऑपरेशन लोटसची परिस्थिती उद्भवू नये म्हणून काँग्रेसने आमदारांना सतर्क केले आहे. काँग्रेसकडून अनेक चार्टर विमाने बुक केली असून खरगेही बेंगळुरुला पोहोचले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आघाडीवर डी.के.शिवकुमार आघाडीवर आहेत.
काँग्रेसकडून पहिले मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर डी. के शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार आहे. काँग्रेसचा अडीच -अडीच वर्षे असा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला तयार आहे, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन मुख्यमंत्री होणार आहेत. डीके शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी काँग्रेसला नवसंजीवनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळवून स्वबळावर पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी ते म्हणाले कर्नाटकच्या हितासाठी आपले वडील मुख्यमंत्री व्हायला हवेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करु, असे ते म्हणाले.
दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. आम्ही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करु. यात काही शंका नाही. पंतप्रधानांच्या प्रचाराचा प्रभाव पडला नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केल्याने बंगळुरसह राज्यातील अनेक भागांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.
निवडणूकपूर्व चाचण्या आणि एक्झिट पोलमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काही एक्झिट पोलनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊ केले आहे. कुणाचे भाकीत खरे, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान, काँग्रेला 120 जागा मिळत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.