अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाबाबत खोटे बोलत आहेत. विकासाचे चित्र रंगवले जातेय, अशी टीका करत गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग आहेत, यावर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोट ठेवले. राहुल गांधी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. अखेरच्या टप्प्यात ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या धामधुमीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. मोदी हे भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या भ्रष्टाचारावर का बोलत नाही. त्याचवेळी विकासाचे चित्र जे रंगवले जात आहे. त्याप्रमाणात विकास झालेला नाही, अशी टीका केली.
गुजरातमध्ये निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा पाहा. या निवडणुकीत काँग्रेसला विजय नक्की मिळले, असा दावा राहुल गांधी यांनी केला. मोदी यांनी केवळ श्रीमंताना झुकते माप दिलेय. गरीब गरीबच राहिल्याची टीका यावेळी राहुल यांनी केली. दरम्यान, आमचे गुजरात विकासाचे व्हिजन तयार, अशी माहिती राहुल गांधी यांनी यावेळी दिली.
Jahan mauka milta hai vahan mandir jaata hoon, Kedarnath bhi gaya tha, vo kya #Gujarat mein hai?: Rahul Gandhi on ppl linking his temple visits to #GujaratElection2017 pic.twitter.com/gIpheAV9t2
— ANI (@ANI) December 12, 2017