नवी दिल्ली : प्रवासी मजुरांना घरी परतवण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. यातच आता रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंग यांनी या प्रकरणावरुन प्रियंका गांधींवरच टीका केली आहे. गांधी कुटुंबाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या आदिती सिंग यांनी ही क्रुर चेष्टा असल्याचं म्हणलं आहे.
'अशा परिस्थितीमध्ये राजकारण करण्याची काय गरज आहे? एक हजार बसची यादी पाठवली, त्यातही अर्ध्यापेक्षा जास्त बसचा फर्जीवाडा. २९७ भंगार बस, ९८ ऑटो रिक्षा आणि एम्ब्यूलन्स सारख्या गाड्या, ६८ वाहनांची कागदपत्र नाहीत. ही कसली क्रुर चेष्टा आहे. जर बस होत्या तर राजस्थान, पंजाब, महाराष्ट्रात का नाही पाठवल्या,' असं ट्विट आदिती सिंग यांनी केलं आहे.
आपदा के वक्त ऐसी निम्न सियासत की क्या जरूरत,एक हजार बसों की सूची भेजी, उसमें भी आधी से ज्यादा बसों का फर्जीवाड़ा, 297 कबाड़ बसें, 98 आटो रिक्शा व एबुंलेंस जैसी गाड़ियां, 68 वाहन बिना कागजात के, ये कैसा क्रूर मजाक है, अगर बसें थीं तो राजस्थान,पंजाब, महाराष्ट्र में क्यूं नहीं लगाई।
— Aditi Singh (@AditiSinghINC) May 20, 2020
काँग्रेस आमदार आदिती सिंग यांनी योगी आदित्यनाथ यांचंही कौतुक केलं. 'कोटामध्ये जेव्हा उत्तर प्रदेशचे हजारो विद्यार्थी अडकले होते, तेव्हा या तथाकथित बस कुठे होत्या? तेव्हा काँग्रेस सरकारने या मुलांना घरापर्यंत सोडणं तर दूरच, सीमेपर्यंतही सोडलं नाही. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी रात्री बस बोलवून या मुलांना घरी पाठवलं. खुद्द राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचं कौतुक केलं होतं,' असंही आदिती सिंग म्हणाल्या.