नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केलं. पण अमित शाहंच्या ध्वजारोहणावेळी गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ध्वजारोहणासाठी अमित शाहंनी रस्सी खाली खेचली असता झेंडाच खाली आला. यानंतर अमित शाहंनी दुसरी रस्सी खेचत झेंडा पुन्हा वर नेला आणि ध्वजारोहण केलं. अमित शाहंचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनं त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
जे देशाचा झेंडा सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? ५० वर्षांपेक्षा जास्त देशाच्या तिरंग्याचा तिरस्कार करणाऱ्यांनी जर असं केलं नसतं तर आज तिरंग्याचा असा अपमान झाला नसता. दुसऱ्यांना देशभक्तीचं सर्टिफिकेट देणाऱ्यांना राष्ट्रगीताचं तारतम्य नाही, असं ट्विट काँग्रेसनं केलं.
जो देश का झंडा नहीं संभाल सकते, वो देश क्या संभालेंगे?
50 साल से ज्यादा देश के तिरंगे का तिरस्कार करने वालों ने अगर ये नहीं किया होता तो शायद आज तिरंगे का ऐसा अपमान न होता।
दूसरों को देशभक्ति का सर्टिफिकेट देने वालों को राष्ट्रगान का तौर-तरीका तक पता नहीं। pic.twitter.com/FmiEI5B7D7
— Congress (@INCIndia) August 15, 2018