मुंबई : देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. (Coronavirus in India) महाराष्ट्रानंतर आता राजधानी दिल्लीतही (Coronavirus in Delhi) भयानक स्थिती दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडक संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. तशी त्यांनी घोषणाही केली आहे. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती दिसणार आहे. दिल्लीत आज रात्रीपासून पुढच्या सोमवार सकाळपर्यंत संपूर्ण संचाबंदी जाहीर करण्यात आली आहे. (Strict curfew in Delhi from tonight till April 26)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बिजल यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या स्थितीबाबत बैठक घेतली. ज्यात संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात आला. आज रात्रीपासून सक्तीने ही संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे, नागरिकांना 26 एप्रिलपर्यंत घरातच राहावे लागणार आहे. दिल्लीत यापूर्वी विकेन्ड संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. शहरात केवळ 100 हून कमी आयसीयू बेड शिल्लक असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, केंद्र सरकारच्या रुग्णालयांतील 7000 बेड कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची मागणी करत केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे.
रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे दिल्लीमध्ये आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक ठिकाणी बेडस उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होऊ शकलेलं नाही. यामुळे दिल्ली सरकारने एका कंट्रोल रुमचीही स्थापना केली आहे. हा कंट्रोल रुम ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याच्या डाटावर नियंत्रण ठेवणार आहे.
दिल्लीतील पूर्ण संचारबंदी दरम्यान मॉल, स्पा, जिम, सभागृह पूर्णपणे बंद राहतील. तथापि सिनेमा हॉल 30 टक्के क्षमतेसह चालू शकतील. यासह, प्रत्येक झोनमध्ये एका दिवसात फक्त एका साप्ताहिक बाजारास परवानगी असेल. शनिवार आणि रविवारच्या कर्फ्यू दरम्यानही अशीच व्यवस्था केली होती.
दिल्लीत कोरोना विषाणूचा कहर कायम आहे आणि गेल्या 24 तासांत एकूण 25462 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर या काळात 161 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीत कोविड -19चे आतापर्यंत 8 लाख 53 हजार 460 लोकांना संसर्ग झाला असून 12121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 20159 लोक बरे झाले, तर कोरोना विषाणूच्या सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 74 हजार 941 झाली आहे.