मुंबई : जर तुम्हाला कामावर उशीरा जाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. यापूढे उशीरा कामावर येणाऱ्यांच्या सुट्ट्या कापल्या जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.
या विभागातील कोणताही कर्मचारी ९.४५ नंतर कामावर आल्यास त्याला भुर्दंड भोगावा लागणार आहे.
प्रत्येक ३ विलंबानंतर कर्मचाऱ्यांची आकस्मिक सुट्टी (सीएल) त्यांच्या खात्यातून कापली जाणार आहे. तसेच उशीरा आल्याचे कारण त्यांना लिखीत स्वरूपातही द्यावे लागणार आहे.
डब्ल्यूसीडीमध्ये नोकरी करणारे अधिकारी सकाळी ९.४५ पर्यंतही कार्यालयात पोहोचत नसल्याचे दिसून आले. त्यानंतर या विभागाने हा निर्णय घेतला.
या संदर्भातले निवेदन विभागाने जारी केले आहे. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचावे असे यात लिहिले आहे.
३ वेळा ९.४५ नंतर आलेल्यांची आकस्मिक सुट्टी रद्द करण्यात येणार असल्याचे ज्ञापनमधील उप निर्देशक एस.श्रीवास्तव यांनी सांगितले.
तसेच उशीरा येण्याचे कारण लेखी स्वरूपात द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जर संबधित कर्मचाऱ्याच्या खात्यात आकस्मिक सुट्टी शिल्लक नसेल तर ईएल (अर्न्ड लिव्ह) ही कापली जाईल असे निर्देशही देण्यात आले आहेत.