Anand Mahindra Viral Post: देशात प्रतिभावंत लोकांची कमी नाही, असं देसी जुगाड पाहिल्यानंतर म्हणावं लागेल. देसी जुगाडा संदर्भातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जुगाड पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक जुन्या स्कूटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. टाकाऊपासून टिकाऊ या क्लुप्तीप्रमाणे कन्स्ट्रक्शन साइटवर जुन्या स्कूटरचा वापर केला जात आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकत की, स्कूटरच्या माध्यमातून सिमेंटच्या गोणी चौथ्या मजल्यावर पोहोचवल्या जात आहेत. स्कूटरच्या मागच्या चाकाजवळ एक रस्सी बांधली आहे. एकदा एक्सलेटर दिल्यानंतर मागचं व्हील फिरत आणि रस्सी गुंडाळत जाऊन गोणी वरपर्यंत पोहोचते. हा व्हिडीओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा आवाक् झाले आहेत.
आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'मला वाटतं यासाठी आम्ही यांना 'पॉवर ट्रेन' असं म्हणतो. वाहन इंजिनाच्या शक्तिचा वापर करण्याचे अनेक पद्धती आहे. ई स्कूटरसोबत हे आणखी सोपं आणि शांततेत होईल. ई स्कूटरची प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली किंवा सेकंड हँड उपलब्ध झाल्या की सांगायला नको.' 6 डिसेंबरला अपलोड केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
I guess that’s why we call them ‘power’trains. Many ways to utilise the power of vehicle engines. This would be even better ( and quieter!) with an e-scooter, once their cost is brought down or they are available second-hand. pic.twitter.com/Xo6WuIKEMV
— anand mahindra (@anandmahindra) December 6, 2022
बातमी वाचा- Maruti Suzuki ने विक्री केलेल्या 9 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या, कारण...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर युजर्सची प्रतिक्रिया देण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. काही जणांनी या देसी जुगाडला किती खर्च आला असेल हे ही सांगितलं आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'स्कूटर बाजारात दोन ते चार हजार रुपयात विकल्या जातात.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'गजर ही शोधाची जननी आहे. आम्ही भारतीय वाहनांचा योग्य पद्धतीने वापर करतो. कामं सोपं करण्यास आम्ही हुशार आहोत.'