सूरत : सूरतमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठ्या चोरीची नोंद झालीय. एका डायमंड कर्मचा-याकडून २० कोटी रुपयांचे हिरे लुबाडण्यात आले आहेत.
या चोरीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ज्यात चोरी करून तीन चोर धावत जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. ज्यात एकाच्या हाती बॅगही दिसतेय. या बॅगेतच स्टार डायमंड कंपनीचे हिरे होते. कंपनीचा कर्मचारी एका कारमधून तो हिरे जमा करण्यासाठी जात असताना सहा जणांनी त्याला अडवलं.
इलेक्ट्रीक स्टिकने त्याला करंट दिला आणि त्याच्या हातातील बॅग घेऊन ते पळाले. यापैकी तीन जण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. सीसीटिव्ही व्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातील लोकांची चौकशी सध्या सुरु आहे. अद्याप चोर हाती लागलेले नाहीत.