बंगळुरु : वाढत्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव आणि कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंदारे यांची पदे मात्र कायम ठेवण्यात आली आहेत. काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांनी नवी दिल्लीत ही घोषणा केली. लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये प्रचंड बेबनाव झाला आहे. तसेच मित्रपक्ष असलेल्या जेडीएससोबतही संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचले आहेत. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठी अडचण वाढली आहे.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी या निर्णयाबद्दल सांगितले, काँग्रेसने केपीसीसीचे अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष यांना कायम ठेवत प्रदेश समिती बरखास्त केली आहे. आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीची पुर्नबांधणी करावी लागेल, अशी विनंती केली होती.
Karnataka Pradesh Congress Committee President Dinesh Gundu Rao: Congress President gave approval (to dissolve KPCC).Now we've to see how to reorganise not only KPCC but also district Congress & Block Congress committees. It'll be a total reorganisation of the party at all levels https://t.co/6WnTofLQyw
— ANI (@ANI) June 19, 2019
राहुल गांधी यांनी आमची मागणी मान्य करत समिती बरखास्तीचे आदेश दिले आहेत. आता आम्हाला केवळ प्रदेश समितीचेच नाही तर जिल्हा काँग्रेस आणि ब्लॅाक काँग्रेस समितीची देखील नवनियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या अगोदर नवी समिती तयार करावी लागणार आहे.