मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीनंतर गुरुवारी सलग पाचव्या दिवशी पेट्रोलच्या दरांत घसरण पाहायला मिळालीय. तर डिझेलमध्ये चार दिवसानंतर गुरुवारी ६ पैसे प्रती लीटरनं घसरण झालीय. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होताना दिसतेय. गुरुवारी सकाळी मुंबईत पेट्रोल ७५.६३ रुपये प्रती लीटर तर डिझेल ६६.८७ रुपये प्रती लीटर दरावर आहे.
तर दिल्लीत पेट्रोल जुन्याच दरानं म्हणजेच ६९.९३ रुपये प्रती लीटर आणि डिझेल ६३.७८ रुपये प्रती लीटरच्या स्तरावर पोहचलंय.
गुरुवारी कोलकतामध्ये पेट्रोल ७२.१९ रुपये, डिझेल ६५.७० रुपये, चेन्नईत पेट्रोल ७२.६५ रुपये आमि डिझेल ६७.४७ रुपये, नोएडामध्ये पेट्रोल ७०.४५ रुपये आणि डिझेल ६३.९१ रुपये आणि गुरुग्राममध्ये पेट्रोल ७०.३६ रुपये आणि डिझेल ६३.२७ रुपये प्रती लीटर आहे.
अमेरिका आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या ट्रेड वॉरमध्ये काहीतरी मार्ग निघू शकेल, असे संकेत मिळाल्यानंतर कच्च्या तेलाच्या भावांत थोडी वाढ पाहायला मिळालीय. व्यापारिक तणाव दूर झाल्यानंतर कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय मागणी वाढण्याची शक्यता आहे.