Crime News In Marathi: घरमालकाने भाडेकरुना राहते घर खाली करण्यास सांगितले. त्यानंतर भाडेकरुनी मालकासोबत केलेले कृत्य पाहून एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे ही घटना घडली आहे. भाडेकरु आणि घरमालकामध्ये वाद झाल्यानंतर जोडप्याने मालकाच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे त्यानंतर ते घर सोडून फरार झाले होते. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, आता जोडप्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. (Crime News Today)
आरोपी दाम्पत्य कंकरखेडा परिसरात आनंद विहार कॉलनीमध्ये राहतात. तर, घरमालकदेखील याच सोसायटीत राहत होते. निखिल आणि त्याची पत्नी आरतीने गुरुवारी कथितरित्या 40 वर्षांच्या रितूची निर्घृण हत्या केली आहे. घटना घडली तेव्हा तिचा पती राम कुमार घरी नव्हते. तेव्हाच दोघांनीही रितूची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून घरातून रितूचा मृतदेह जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. राहते घर खाली करण्याबाबत घरमालक आणि भाडेकरु यांच्यात वाद झाला होता. त्यातूनच हि हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी निखील आणि आरतीला अटक करण्यात आली असून लवकरच त्यांना कोर्टात हजर करणार आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मेरठमध्येही अशीच घटना घडली घडली आहे. काम केल्यानंतर पैसे मागितल्यावर एका व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला होता. मिस्त्रीचे काम करणाऱ्या इंदु शेखरची पहिले आरोपींनी गोळी मारुन हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवला. मृतदेहाचे दोन्ही हात बांधण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, एका व्यक्तीसोबत त्याचे पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन वाद झाले होते त्यातूनच ही हत्या घडली आहे. इंदु शेखरची हत्या करण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह शेतातील झाडाला लटकवण्यात आला होता.