मुंबई : 'जो देतो तो देवा', उक्तीप्रमाणेच डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. रूग्णाचे प्राण वाचवण्याची प्रतिज्ञा घेतलेले डॉक्टर शेवटपर्यंत शर्थिचे प्रयत्न करत असतात. पण रूग्णाचे प्राण वाचवताना जेव्हा स्वतः डॉक्टर स्वतःचे प्राण गमावतो. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.
तेलंगणातील एका डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने अनपेक्षित मृत्यू झाला आहे. रूग्णालयात उपस्थित लोकांना धक्काच बसला. वास्तविक हृदयविकाराच्या झटक्यानंतर आणलेल्या रुग्णावर उपचार करत असताना या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.
उपचारादरम्यान डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. हा तरुण डॉक्टर मूळचा महबूबाबाद जिल्ह्यातील असून तो निजामाबाद मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता.
तेलंगणा टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, हा प्रकार कामारेड्डी जिल्ह्याच्या गांधारी मंडळमधील एका नर्सिंग होममध्ये घडला. 40 वर्षीय डॉक्टर लक्ष्मण यांचा मृत्यू झाला आहे.
60 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टर लक्ष्मणला हृदयविकाराचा झटका आला. जगैया नाइक यांना रविवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांनतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टर लक्ष्मण हे उपस्थित स्टाफसोबत रूग्ण जगैया यांच्यावर ICU मध्ये उपचार करत होते. तेव्हा अचानक डॉक्टर लक्ष्मण खाली कोसळले. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
जगैया नाइक यांची तब्बेत बिघडल्यावर त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. लक्ष्मण यांचा देखील मृत्यू झाला.