नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने निवडणुकीत मतपत्रिकेबाबत एकमत होण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांचा देखील समावेश आहे. ही बैठक अशा वेळी होते आहे जेव्हा मोदी सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र करण्याची चर्चा करत आहेत.
विरोधी पक्ष ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. निवडणूक आयोगाने ही सामान्य बैठक असून यामध्ये निवडणुकीत सुधार आणण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
बैठकीला 7 राष्ट्रीय पक्ष आणि 51 प्रादेशिक्ष पक्षाच्या नेत्यांना बोलावण्यात आलं आहे.
निवडणुकीत खर्च करण्याची मर्यादा कमी करण्यासाठी आणि चांगले प्रतिनिधी देण्यासाठी पक्षांना आवाहन केलं जाऊ शकतं. निवडणुकीमध्ये खर्चावर नियंत्रण, विधान परिषद निवडणुकीत खर्चाची मर्यादा, आणि राजकीय पक्षांवर देखील खर्चाची सीमा ठरवण्याबाबत चर्चा केली जाऊ शकते.