काश्मीर : Pulwama Encounter Update: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार चकमक झाली. (Encounter in Pulwama ) या चकमकीत तीन दहशतवादी ठार झालेत. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरु असलेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवादी मारले गेले. आतापर्यंत एकूण 3 दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्यांसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या पुलवामा परिसरात शोधमोहीम सुरु आहे.
पुलवामा येथे मारले गेलेले तिन्ही दहशतवादी स्थानिक आहेत. ते एलईटी या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. 13 मे रोजी आमचे सहकारी शहीद रियाझ अहमद यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या जुनैद शेरगोजरी यापैकी एकाची ओळख पटली आहे, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली.
#PulwamaEncounterUpdate | All three killed terrorists are locals, linked with terror outfit LeT. One of them has been identified as Junaid Sheergojri, involved in the killing of our colleague Martyr Reyaz Ahmad on May 13: IGP Kashmir Vijay Kumar
(File pic) pic.twitter.com/1fBtfsr6g6
— ANI (@ANI) June 12, 2022