मुंबई : तुम्ही असे अनेक लोकं पाहिली असतील जे भरपूर पैसा कमवतात. असं असूनही, अर्धा महिना उलटताच, त्यांना कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांकडून पैसे मागावे लागतात. तुमच्यासमोर अळशी परिस्थिती येत नाही ना. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 मोठ्या चुका सांगणार आहोत, ज्यामुळे लोकांच्या हातात पैसा राहत नाही. जर तुम्हीही अशा चुका करत असाल तर आजच त्या बदलणं चांगलं आहे.
पैशांविषयी असलेल्या वाईट सवयी
लोकांना आवश्यक वस्तू खरेदी करणं सामान्य आहे. परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना खरेदी करण्याची आवश्यकता नाही, तरीही ते दर आठवड्याला किंवा दर महिन्याला आवड म्हणून खरेदी करतात. अशाप्रकारे, हौशी खरेदीमध्ये खरेदी केलेल्या बहुतेक गोष्टींचा त्यांना काहीही उपयोग होत नाही, त्यामुळे त्यांच्या पैशाची केवळ उधळपट्टी होते. तुम्हाला अशी खरेदीची आवड असेल तर वेळीच बदल करण्याचा तुम्हाला फायदा होईल.
कधीकधी एखाद्या खास प्रसंगी मित्रांसोबत पार्टी करणं ठीक आहे. मात्र दररोज पार्टी करणं योग्य नाही. यामुळे जास्त खर्च देखील होतो. तुमच्या या चुकीच्या छंदामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी 500-1000 रुपयांचं नुकसान होतं. तुम्ही महिन्यातून 15 दिवसही अशी पार्टी केलीत तर तुमचे थेट 15 हजार रुपयांचे नुकसान होतंय. या 15 हजार रुपयांमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किती करू शकता याचा विचार करा. म्हणून, शक्य असल्यास पार्टी करणं टाळा.
आपल्या देशात एक म्हण आहे की, चादर पाहून पाय पसरले पाहिजेत. म्हणजेच तुमची आर्थिक स्थिती पाहून पैसा खर्च व्हायला हवा. काहीजणं कमाईपेक्षा जास्त खर्च करतात आणि मग इतरांकडून उधार मागण्यासाठी हात पुढे करतात. ज्या घरांमध्ये अशी सवय असते, त्यांना आयुष्यात कधीच प्रगती करता येत नाही आणि त्यांना नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.