नवी दिल्ली : आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.
रविवारी उत्तर पूर्व राज्यातील २१ जिल्ह्यांतील १० जण वाहून गेलेत तर पुरामुळे सुमारे २२.५ लाख लोक मृत्यूमुखी पडले. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटलेय, आजच्या मृत्यूमुळे यावर्षी पूरग्रस्त घटनांची संख्या ९९पर्यंत पोहचली आहे. ब्रह्मपुत्रा आणि १० अन्य नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. १५ ठिकाणांना मोठा धोका पोहोचला आहे.
काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगलाचे सर्वात जास्त भाग पाण्याखाली आलाय. पोबितो वन्यजीव अभयारण्य आणि लॉखुआ वन्यजीवांचे अभयारण्य पाण्याखाली गेलेय. नागांवचे उपायुक्त शमशेर सिंग यांनी सांगितले, ब्रह्मपुत्रा नदीच्या पुराचे पाणी जिल्ह्यातील सर्वदूर पसरले आहे.
धुब्री येथे सर्वाधिक फटका लोकांना बसला आहे. ३.९८ लाख लोक प्रभावित झाले आहेत. तर या पावसाचा फटका दळणवळणावर झालाय. २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर १४ गाड्या या काही स्थानकांवर फसल्या आहेत. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. काही ठिकाणी पुराचे पाणी रेल्वे रुळावर आलेय.
राज्यात नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी डिब्रूगढ जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आणि परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारला शक्य ती सर्व मदत देण्याचे जाहीर केलेय.
दुसरीकडे, नेपाळच्या सीमांचल आणि त्रिपुरामध्ये कालपासून मुसळधार पावसामुळे बिहारच्या किशनगंज, पूर्णिया, अररिया आणि कटिहार जिल्ह्यांमधील पूरपरिस्थितीमुळे येथील स्थिती दयनिय झाली आहे. इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये दरभंगा, मधुबनी, सीमामहरी, मधेपुरा, सहरसा, सुपौल, पूर्व आणि पश्चिम चंपारण या जिल्ह्यांचा समावेश आहे.
अरियारियातील किशनगंज, कटिहार आणि जोगबनी येथील रेल्वे स्थानकांत पुराचे पाणी घुसलेय. त्यामुळे अनेक गाड्या अडकल्यात. रविवारपासून १८ रेल्वेगाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. यापावसामुळे कोट्यवधी रुपयांची हाणी झाली आहे. शेतीला मोठा फटका बसलाय. अनेक हाती आलेली पिके खराब झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झालेय. या पुरामुळे २० लाख लोक प्रभावित झाले आहेत. पुरात अडकलेल्यांना घरांतून बाहेर काढण्यात येत आहे. तर काहींना जिल्ह्यातून दुसरीकडे हलविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लष्कर आणि भारतीय वायुसेनेच्या जवानांची मदत मागितली आहे. प्रभावित लोकांना मदत व बचाव करण्याची मागणी केली आहे. सर्व संभाव्य सहाय्य पुरवण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी मदत निश्चित केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे नीतीश कुमार यांनी सांगितले.
नदी परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. सतत पाऊस कोसळत असल्याने बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. अहवालानुसार, आतापर्यंत बाधित झालेल्या भागात १० जणांचा मृत्यू झालाय. कोशी, महानंदा, गंडक, बागममती आणि गंगा यासारख्या प्रमुख नद्यांना पूर आलाय.