नवी दिल्ली : पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी तीन आरोपींचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. एसआयटीकडून अडीचशे संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.
गौरी लंकेश हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींचं स्केच जारी करण्याता आल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्ररणी पोलिसांनी आतापर्यंत २०० ते २५० जणांची चौकशी केल्याची माहिती एसआयचीनं दिली आहे.
तसेच या हत्येप्रकरणी आतापर्यंतच्या तपासात सनातन किंवा दुसऱ्या कोणत्याही संस्थेचा उल्लेख नसल्याचे एसआयटीनं स्पष्ट केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या व्हिडीओच्या सहाय्याने ही रेखाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. गौरी लंकेश यांच्या मृत्यूपूर्वी सात दिवस तेथील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत यासाठी घेण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान गौरी यांची हत्या करण्यात आली होती.