मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यांना लोकांकडून शेअर केले जातात आणि त्याला जास्त views देखील मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुम्हाला सर्वत्र सोशल मीडियावर पाहायला मिळेल जिथे एक मुलगी एका कार चालकाला बेदम मारत आहे. परंतु ती त्याला का मारत आहे? हे काही कोणाला कळत नव्हतं त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात असे आले की, नक्कीच त्या कार चालाकाची काहीतरी चुक असणार, त्यानेच काहीतरी केलं असणार ज्यामुळे ही मुलगी त्याला मारत असावी. त्यामुळे बहुतेक लोकांनी त्यामुलीची बाजू घेतली आहे.
परंतु आता ही मुलगी त्या कार चालकाला का मारत होती? यात चुक नेमकी कोणाची आहे हे एका व्हिडीओमुळे स्पष्ट झालं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा लखनऊमधील आहे. ज्यात एक महिला कॅब चालकाला रस्त्याच्या मध्यभागी पोलिसांसमोर कानाखाली मारताना दिसत आहे. ती महिला त्या चालकाचं काही ऐकून न घेता त्याला फक्त कानाखाली मारत सुटते. आजुबाजुचे लोकं आणि पोलिस जेव्हा मधे पडतात तरी देखील ही महिला कोणाचे ऐकायला तयार नसते. ती सरळ त्या चालकाला मारतच सुटते. लोकांनाही फारसे याबद्दल काही माहिती नसल्याने लोकं देखील यात काही बोलू शकत नाहीत.
Viral Video: A Girl Continuously Beating a Man (Driver of Car) at Awadh Crossing, Lucknow, UP and allegedly Damaging his Phone inspite of him asking for Reason pic.twitter.com/mMH7BE0wu1
— Megh Updates (@MeghUpdates) July 31, 2021
परंतु आता या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यावरून हे प्रकरण कसे सुरू झाले आणि यात चुक नेमकी कोणीची याबद्दलची माहिती आता सगळ्यांसमोर आली आहे.
हे प्रकरण लखनऊमधील अवध चौकातील आहे आणि तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, मुलगी चालत्या वाहनांच्यामध्ये रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान ती मुलगी अचानक कॅब समोर येते. यानंतर, चालक ब्रेक लावून गाडी थांबवतो, त्यानंतरच ती मुलगी येते आणि कॅब चालकाला मारहाण करण्यास सुरुवात करते.
All those who are saying "Bina baat toh nai maara hoga" look at this #ArrestLucknowGirl @Uppolice @adgzonelucknow pic.twitter.com/JGB8gOeLq0
— Saif Rangrez (@mr_saif_17) August 2, 2021
सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर लोक संतापले आहेत. लोकांना आता यामध्ये नक्की चुकी कोणाची? आणि हे सगळं प्रकरण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समोर आले, ज्यामुळे सगळे लोकं या मुलीच्या अटकेची मागणी करत आहेत.
ट्विटरवर #ArrestLucknowGirl ट्रेंड करत आहे. या प्रकरणात, आता पोलीस देखील तपासाबद्दल बोलत आहेत, परंतु लोक पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
व्हिडीओमध्ये ट्रॅफिक पोलिसांसमोर महिला कॅब चालक सतत थप्पडांचा पाऊस पाडताना दिसत आहे. दरम्यान, एक पोलीस हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो, पण महिलेला एकापाठोपाठ एक थप्पड मारली जाते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की कॅबचा साईड आरसाही तुटलेला आहे. कॅब चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला या महिलेने पकडले. त्याच्यावर देखील हाथ उचलण्याचा प्रयत्न केला.