मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात धातूवर वाढलेल्या दबावामुळे स्थानिक दिल्ली सर्राफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर कमी झाले आहेत. सोनं 50 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोनं आज 32,220 रुपये प्रति ग्रॅम झालं आहे तर चांदी 100 रुपयांनी कमी झालं असून 39,500 रुपये प्रति किलो झालं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2.40 डॉलरने कमी झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1223.15 डॉलर प्रति औंस झालं आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत देखील सोनं 2 डॉलरने कमी झालं असून 1224 डॉलर प्रति औंस झालं आहे.
चांदींचे भाव देखील कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 14.60 डॉलर प्रति औंस झाली आहे.