मुंबई : सकारात्मक जागतिक निर्देशांदरम्यान, मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते मंगळवारी दिल्लीत सोन्याचे भाव 45 रुपयांनी वाढून 48,273 रुपयांवर गेले. मागील सत्रात सोन्याचे दर 48,228 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. सिक्युरिटीजनुसार चांदीचा दर 407 रुपयांनी वाढून 59,380 रुपये प्रतिकिलोवर आला. मागील सत्रात चांदीचा दर प्रतिकिलो 58,973 रुपये होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, रुपया मजबूत झाल्यानंतरही जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत झालेल्या रिकव्हरीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली.''
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची किंमत वाढल्याचे दिसून आले आणि ते प्रति औंस 1,812 डॉलरवर पोहोचले. त्याचप्रमाणे चांदीची दर प्रति औंस 23.34 डॉलर वर गेले. मंगळवारी चांदीचे दर 962 रुपये म्हणजेच 1.6 टक्क्यांनी वाढून 61,184 रुपये प्रतिकिलोवर गेले.