सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती आहे प्रति तोळा दर

गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 28, 2017, 10:36 PM IST
सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती आहे प्रति तोळा दर
Representative Image

नवी दिल्ली : गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

३० हजारी पार

सोन्याच्या दरात १७५ रुपयांनी वाढ झाल्याने सोन्याने पुन्हा ३० हजारीचा टप्पा पार केला आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या वाढीमुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३०,२५० रुपये झाला आहे.

सलग पाचव्या दिवशी वाढ

सोन्याच्या दरात होणारी मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वैश्विक संकेतांनंतर सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं दिसत आहे.

चांदीचा दरही चमकला

सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही वाढ होताना पहायला मिळत आहे. चांदीच्या दरात २५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.  शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी वाढल्याने चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.३३ टक्क्यांची वाढ होत ते १,२९१.१० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात ०.५ टक्क्यांनी वाढ होत १६.७५ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात १७५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: ३०,२५० रुपये आणि ३०,१०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.