मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे अस्थिर आहेत. सोन्याच्या दरामध्ये कधी वाढ तर कधी घट नोंदवण्यात येत आहे. मंगळवारी देखील सोन्याचे घसरले होते. 2020 साली सोन्याच्या दराने तब्बल 56 हजार 2534 रूपयांचा आकडा गाठला. यंदाच्या वर्षी सोन्याच्या दरात जवळपास 8 हजार 530 रूपयांची घट नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सोन्याचे दर प्रति ग्रॉम 225 रूपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी 24 कॅरेट सोन्यासाठी 47 हजार 724 रूपये ग्राहकांना मोजावे लागले.
इंडिया बुलियन एण्ड ज्वेलर्स एसोसिएशन द्वारा जारी केलेल्या ताज्या आकड्यांनुसार 23 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 533 रूपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 43 हजार 715 रूपये प्रति 10 ग्रॉम आहे. इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स एसोसिएशन द्वारा जारी केलेल्या दरांमध्ये प्रत्येक शहरात 500 ते 1000 रूपयांचा फरक असणार आहे.
दिल्लीत सोन्याचे दर 123 रूपयांनी तर चांदीचे दर 206 रूपयांना घसरले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजार मंगळवारी सोन्याचे दर 46 हजार 505 रूपये होते. मुंबईत देखील सोन्याचे दर दहा ग्रॅम 210 रुपयांनी घसरून 46,660 रुपयांवर पोहोचले आहेत. गोल्ड रिटर्न वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॉम 45,040 रुपये आहे.