शेअर मार्केटला टक्कर! मोल्यवान धातूने वर्षभरात दिले 14600 रुपयांचे रिटर्न्स

Gold Investment Strategy: भारतात सोनं खरेदी करण्यामागे काही परंपरा आणि धार्मिक श्रद्धादेखील आहेत. त्यामुळं भारतीय मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात.   

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 21, 2024, 02:08 PM IST
शेअर मार्केटला टक्कर! मोल्यवान धातूने वर्षभरात दिले 14600 रुपयांचे रिटर्न्स title=
Gold Return highest in 14 years Should you invest all you need to know

Gold Investment Strategy: भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते. गावागावांत व मोठ्या शहरांतही सोन्याचे दागिने व चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. लग्नसमारंभाच्या काळात सर्वसामान्य नागरिक त्यांच्या पूर्ण जमापुंजी दागिने खरेदी करण्यात खर्च करतात. भारतात सोन्याच्यी खरेदी सरासरी देशाच्या एकूण जीडीपीएवढी झाली तर नवल वाटायला नको. सोनं हा गुंतवणुकीसाठा चांगला पर्याय असतानाहीदेखील सर्वसामान्य लोक त्याचा लाभ घेताना दिसत नाहीत. भारतीय ग्राहक दागिन्यांमध्ये पैसा लावतात मात्र गुंतवणूक करताना दिसत नाहीत. 

गेल्या 14 वर्षांत सोन्याने आत्तापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर गाठला आहे. या वर्षात सोन्याने 28 ते29 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली आहे. यंदा सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. यामुळं त्याचा परिणाम सोन्याच्या परताव्यावर होताना दिसत नाहीये. या दिवाळीत सोन्याच्या किंमतीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळं सोन्याच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पाच दिवसांत धनत्रयोदशीला सोनं-चांदीचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. भारतीय सोन्याचे नाणे किंवा मूर्तीवगैरे खरेदी करतात. त्यामुळं सोन्याची मागणी वाढते. 

मौल्यवान धातु म्हणून सोन्याबद्दल बोलायचं झाल्यास सोनं तुम्हाला चांगला परतावा देत आहेत. शक्तिशाली गुंतवणूक मालमत्तेच्या यादीत वरच्या स्थाना सोन्याने स्थान मिळवलं आहे.  सोन्याच्या गुंतवणुकीत मिळालेला परतावा जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या वर्षात सोन्याने 29 टक्क्यांपर्यंत चांगला परतावा दिला आहे. या वर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत सोन्याने गुंतवणुकदारांना 21 टक्क्यापर्यंतचा परतावा दिला आहे. 3 वर्षात सोन्याने 62 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. शेअर बाजारात गुंतवणुक केल्यानंतर जेवढा रिटर्न मिळतो तितकीच जोखीमदेखील पत्करावी लागते. मात्र, सोन्यातील गुंतवणुक सुरक्षित मानली जाते. जागतिक संकट असतानाही सोनं 1 आठवड्यात 2 टक्के आणि एका महिन्यात 4 टक्क्यापर्यंत परतावा देऊ शकला आहे.  

या वर्षात सोनं तब्बल 14,616 रुपयांनी महागलं आहे. 1 जानेवारी 2024 रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,352 रुपये होती. तर, आता 21 सप्टेंबरपर्यंत सोनं 10 ग्रॅम 77,968 रुपयांवर पोहोचले होते. तर, चांदीदेखील महागली आहे. चांदी 1 जानेवारी 2024 रोजी 73,395 रुपये होती तर आता 21 सप्टेंबर रोजी 97,167 रुपयांवर पोहोचली आहे.