कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाच

Virat Kohali And Anushka Sharma Viral Video : न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध 36 वर्षांनी टेस्ट सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली थेट मुंबईला रवाना झाला. 

पुजा पवार | Updated: Oct 21, 2024, 01:28 PM IST
कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाच title=
(Photo Credit : Social Media)

Virat Kohali And Anushka Sharma Viral Video: रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध 36 वर्षांनी टेस्ट सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली थेट मुंबईला रवाना झाला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मा सोबत रविवारी रात्री अमेरिकी गायक कृष्ण दास यांच्या कीर्तन कार्यक्रमात सामील झाला. 

व्हायरल व्हिडीओ : 

रविवारी कृष्णा दास यांच्या मुंबई येशील कीर्तन कार्यक्रमात विराट अनुष्का सामील झाले. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्वतः याबाबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांनी लिहिले की, 'विराट आणि अनुष्का मुंबईतील कृष्णा दास लाइव्हमध्ये सामील झाले, त्यांनी आशीर्वाद आणि शांत वातावरणाचा आनंद घेतला. त्यांच्या उपस्थितीने सामुहिक भक्तीत आणखी भर पडली, त्यामुळे हा मेळावा आणखीनच खास बनला'. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का दोघे कीर्तनाचा आनंद घेताना दिसत आहेत. विराट कीर्तनात साथ देताना दिसतोय तर अनुष्का ही भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेली पाहायला मिळतेय. 

विराट कोहली लग्नानंतर पत्नी अनुष्का सोबत भारतातील अनेक जुन्या मंदिरांना भेटी देताना दिसतो. त्याने यापूर्वी उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरती केली होती. तसेच निम करोली बाबा यांच्या आश्रमाला सुद्धा त्याने भेट दिली होती. तसेच प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनासाठी सुद्धा तो अनुष्का आणि मुलगी वामिका सोबत हजार राहिला होता. मागील काही वर्षात विराटला आध्यात्माची गोडी लागल्याचे सुद्धा पाहायला मिळते. 

विराट कोहलीचा न्यूझीलंड टेस्टमधील परफॉर्मन्स : 

बंगळुरू येथे पार पडलेली भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया चांगलं परफॉर्म करू शकली नाही. टॉस जिंकून पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहली सह भारताचे 4 फलंदाज शुन्यावर बाद झाले. त्यामुळे टीम इंडिया अवघ्या 46 धावांवर ऑल आउट झाली. फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कमबॅक करून न्यूझीलंडने रचलेला 356 धावांचा डोंगर पार केला. यात विराट कोहलीने 70 धावांचे योगदान दिले. 

हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?

 

टीम इंडियात कोणा कोणाला संधी? 

न्यूझीलंड विरुद्ध पुण्यात आणि मुंबईत होणाऱ्या टेस्ट सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून यात वॉशिंग्टन सुंदर सह शुभमन गिलचे देखील पुनरागमन झाले आहे. बंगळुरू टेस्टमध्ये शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली होती, मात्र याचा फटका फलंदाजीत टीम इंडियाला जाणवला. 

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.