मुंबई : सोमवारी दिवसाची सुरुवात होताच Gold price today सोन्याच्या दरांमघ्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली. सकाळी जवळपास साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर जवळपास 105.00 रुपयांच्या वाढीसह सोन्याचे दर प्रतितोळा 48410.00 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदी 185.00 रुपयांच्या वाढीव किंमतीसह प्रती किलो 48550.00 इतक्या दरावर पोहोचली.
कुठवर पोहोचतील सोन्या- चांदीचे दर ?
कोरोना व्हायरस Coronavirusच्या पार्श्वभूमीवर एकंदर परिस्थिती पाहता पुन्हा एकदा गुंतवणूकदारांनी सोन्यात रस दाखवण्यात सुरुवात केली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पुढील काही महिन्यांपर्यंत सोन्याचे दर प्रतितोळआ 52 हजारांच्याही पलीकडे पोहोचू शकतात. इतकंच नव्हे तर, येत्या दोन वर्षांमध्ये सोन्याचे दर 65 हजारांच्या घरात पोहोचू शकतात.
'झी बिजनेस'च्या वृत्तानुसार एंजेस ब्रेकिंगचे उपाध्यक्ष आणि कमोडिटी मार्केटचे जाणकार अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार महामारीमुळं गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीचं माध्यम म्हणून सोन्याकडे पाहत आहेत. गुंतवणुक वाढल्यामुळं सोन्याच्या दरांवरही याचा थेट परिणाम होत आहे.
सोन्यात गुंतवणूक वाढणार
सराफा बाजाराच्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार जगातील सर्वाधिक मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये गुंतवणूक वाढण्याची चिन्हं आहेत शिवाय येत्या काळात सोन्याचे दर तेजीत असल्याचं पाहायला मिळेल. कमोडिटी बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार जगभरातील मोठ्या बँकांनी व्याज दरात कपात केली आहे. सद्यस्थिती पाहता आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत.