मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.09 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 0.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तेजीनंतरही विक्रमी उच्चांकापेक्षा 8232 स्वस्त
सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही ते विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,968 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे.
सोन्याच्या किंमतींमध्ये नेहमीच चढ उतार होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचा परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. देशात सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच लग्नसराईमध्ये सोन्याला मागणी असते. त्या दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असतो.
देशातील मेट्रो शहरात सोन्याचे दर
मुंबई 47,990 प्रति तोळे
पुणे 49,590 प्रति तोळे
नागपूर 47,990 प्रति तोळे
दिल्ली 51,500 प्रति तोळे
मिस्ड कॉल द्या
सोने आणि चांदीचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही अद्यावत दर पाहू शकता.