'गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून'

 बंगळुरूच्या न्यायालयात एसआयटीने आरोपपत्र सादर केलंय. 

Updated: Nov 25, 2018, 09:10 AM IST
'गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून'  title=

बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून रचला जात होता अशी माहिती विशेष तपास पथकाने दिलीय. बंगळुरूच्या न्यायालयात एसआयटीने आरोपपत्र सादर केलंय. एसआयटी'ने मुख्य दिवाणी आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात सादर केलेले पुरवणी आरोपपत्र ९ हजार २३५ पानांचे आहे. त्यात प्रथमच सनातन संस्थेचा उल्लेख करण्यात आलाय. सनातन संस्थेतील एका गटानेच लंकेश यांना लक्ष्य केले मात्र खुनामागील हेतू वैयक्तिक नव्हता, असे आरोपपत्रात म्हटलंय.

गोळीबार सत्र  

 कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली तर १६ फेब्रुवारी २०१५ ला कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरेंवरही मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात मारेक-यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या.

या घटनेच्या दोन वर्षाआधीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. २० ऑगस्ट २०१३ ला अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात ते जागीच ठार झाले.

विषेश म्हणजे या चारही हत्या एकाच प्रकारे करण्यात आल्या असून यातील कोणत्याही मारेकऱ्याला पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही.