नवी दिल्ली : पुढील काही दिवसात केंद्र सरकारचं २०१८-१९ वर्षासाठीचं बजेट सादर केलं जाणार आहे. या बजेटकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे.
कुणाला काय मिळणार? काय स्वस्त, काय महाग होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशात करदात्यांना सरकार दिलासा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे. अर्न्स्ट अॅन्ड यंगच्या बजेट पूर्व सर्व्हेमध्ये ही माहिती मिळाली आहे. टॅक्स कन्सल्टेंटच्या या सर्व्हेनुसार यंदा इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची सीमा वाढवली जाऊ शकते.
सर्व्हेतून समोर आलंय की, नवीन टॅक्स स्लॅबच्या माध्यमातून सरकार मोठी सूट देण्याची घोषणा करू शकते. सर्व्हेमधून हेही समोर आलं आहे की, करदात्यांना दिलासा देण्यासाठी बजेट २०१८-१८ मध्ये इन्कम टॅक्स स्लॅब आणि रेटमध्ये बदल केला जाऊ शकतो.
सर्व्हेत सहभागी ६९ टक्के लोकांचं म्हणनं आहे की, लोकांच्या हाती खर्च करण्यासाठी अधिक पैसा रहावा, यासाठी सरकार थ्रेसहोल्ड लिमिट वाढवू शकते.
सर्व्हेत सहभागी लोकांपैकी ५९ टक्के लोकांचं म्हणनं आहे की, वेगवेगळ्या प्रकारचे जुने डिडक्सन स्टॅंडर्ड डिडक्शनसोबत रिप्लेस केले जातील. यामुळे कामगार लोकांवरील टॅक्सचा भार कमी होईल. हा सर्व्हे जानेवारी महिन्यात करण्यात आला.
यात १५० सीएफओ, टॅक्स हेड आणि सिनिअर फायनॅन्स प्रोफेशनल सहभागी झाले होते. सर्व्हेतील ६५ टक्के लोकांचं म्हणनं आहे की, डिविडेंडच्या सध्याच्या टॅक्सेशनमध्ये बजेटमध्ये कोणताही बदल होण्याची आशा नाहीये.