भिवानी : हरियाणा विद्यालय शिक्षण बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल १८ मे रात्री १२ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. निकालांची पडताळणी सुरू असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष डॉ. जगबीर सिंह यांनी सांगितले. वेरिफिकेशननंतर रात्री १२ वाजता निकाल घोषित करणार असल्याचे ते म्हणाले. दहावीच्या परीक्षेचा निकाल २१ मेला जारी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. www.bseh.org.in या बोर्डाच्या साईटवर निकाल जारी करण्यात येणार आहे.
हरियाणा बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनची अधिकृत वेबसाइट www.bseh.org.in वर जा
होमपेजवरील एंटर टॅबवर क्लिक करा
रिझल्ट टॅबवर क्लिक करा. नवीन विंडो उघडेल.
स्क्रिनवर रिझल्ट येईल. त्याची प्रिंटआऊट घेऊ शकता.
यावर्षी १० वी आणि १२ वीमध्ये ८.२५ लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मार्च ते ४ एप्रिलपर्यंत ही परीक्षा सुरू होती.
हायस्कूल आणि इंटर मीडियएट निकालांसोबतच बीएसईएच D.L.Ed च्या इव्यॅल्यूएशची देखील विद्यार्थी वाट पाहत आहेत. सेकेंडरी आणि सीनियर सेकेंडरी (academic, re-appear, open school) चा निकाल जुलै २०१८ ला ऑनलाईन जारी करण्यात येईल.