मुंबई : शेअर बाजाराची दिशा या आठवड्यात मॅक्रो इकोनॉमिक डेटा, कंपन्यांचे तिमाही रिझल्ट आणि रिझर्व बँकेचे व्याजदरांवर निर्णय यावर ठरणार आहे. ग्लोबल मार्केटची चाल, लसीकरणाचे आकडे देखील बाजाराची दिशा ठरवतील. याशिवाय वाहनांच्या विक्रीचे आकडे, पीएमआयचे आकडे आणि तिमाही निकालांवर बाजाराची चाल निश्चित होईल.
येत्या आठवड्यात रिझर्व बँकेची मॉनिटरी पॉलिसी जाहीर होणार आहे. याशिवाय रिझर्व बँकेची मौद्रिक निती समितीची बैठक याच आठवड्यात होणार आहे.
तसेच या आठवड्यात एचडीएफसी, पीएनबी, अडाणी पोर्ट्स, बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, भारतीय स्टेट बँक आणि महिंद्रा ऍंड महिंद्राचे तिमाही निकाल येणार आहेत.
काही अर्थ तज्ज्ञांच्या मते, RBI चे आकडे, लसीकरण हे बाजाराच्या चालीचे प्रमुख कारक असतील. तसेच मॉन्सुनची प्रगती, कंपन्यांचे तिमाही निकाल आणि कोविड 19 चा संसर्ग हे देखील बाजाराच्या चालीवर प्रभाव टाकतील.