Crime News : ऐकावं ते नवलंच...ज्या वकिलासोबत महिला नवऱ्याला घटस्फोट देणार आहे. त्याच वकिलासोबत तिचं अफेयर सुरु असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला घरी असताना तिने वकिलाला घरी बोलवलं. पण तिच्या धानीमनी नसताना तिथे तिचा नवरा अचानक आला. त्याने त्या दोघांना रंगेहात पडकलं. पतीने या घटनेचा व्हिडीओ बनवला. (Extra Marital Affair)
उल्टा चोर कोतवाल को डांटे का अशी स्थिती होती. या घटनेच्या वेळी पत्नीनेच नवऱ्याला शिवीगाळ करत होती. नवरा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा ती बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसली. हे पाहून पतीला जोरदार धक्का बसला. (Husband caught wife extra marital affair red handed with boyfriend advocate video viral Divorce Cases Crime News Trending)
नवऱ्याला पाहून महिलेचा चेहऱ्यावर काही फरक दिसत नव्हता. ती कपडे घालू दे असं सारखं नवऱ्याला म्हणत होती. त्या उपर ती नवऱ्याला म्हणते तुझी फोटोग्राफी झाली असेल तर तू इथून निघून जा. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
पतीला पाहून घाबरलेल्या वकील बॉयफ्रेंडने धावत जाऊन पँट घातली आणि बेल्ट लावायला लागला. तर ती महिलाही रुमच्या कोपऱ्यात जीन्स घालू लागली. नवऱ्याने तिला अडविण्याचा प्रयत्न केला. मुळीत ती अशी वागत होती जणू काही झालंच नव्हतं. उलट ती नवऱ्यावर दादागिरी करु लागली. अरे कपडे तर घालू दे, असं तिचा सूर होता.
मिळालेल्या माहितीनुसार पत्नीला नवऱ्यासोबत राहायचं नाही आहे. तिने सासरचे लोक कुटुंबाकडून हुंडा मागतात अशी तिने पोलिसांनाकडे तक्रार केली आहे. ज्यावेळी नवऱ्याला कळलं की बायको प्रियकरासोबत पोलीस क्वार्टरमध्ये आहे. तर नवरा पोलीस घेऊन घरी पोहोचला. त्यावेळी नवऱ्याने त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं.
या दोघांचं लग्न 2017 मध्ये झालं होतं. बायकोच्या अनैतिक संबंधातून ते घटस्फोट घेणार होते. पण पत्नीने पोलिसांकडे हुंडा मागत असल्याची तक्रार केली आणि प्रकरण चिघळलं.
ही घटना उत्तर प्रदेशातील असून महिलेचा नवरा आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. सध्या तो कानपूरमध्ये पोस्टिंगवर आहे. या दोघांविरोधात त्याने पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांना समुपदेशन केल्यानंतर सोडून देण्यात आलं.
दरम्यान पत्नीने पतीविरोधात 498अ नुसार कोर्टात दावा ठोकला आहे, अशी माहिती मिळाली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या तळमस्तकातील आग डोक्यात गेली आहे. हा व्हिडीओ दिपीका नारायण भारद्वाज या यूजरने ट्वीट केला आहे.