Important News : फेब्रुवारीच्या 28 तारखेआधी पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

आर्थिक नुकसान कोणालाही न परवडणारं असंच असतं. त्यामुळं ही बातमी तुमच्यासाठी. 

Updated: Feb 20, 2022, 12:38 PM IST
Important News : फेब्रुवारीच्या 28 तारखेआधी पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर होईल आर्थिक नुकसान  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : काही कामं, काही कागदपत्रांची पूर्तता ही निर्धारित वेळेतच पूर्ण केल्यास त्यानंतर उदभवणाऱ्या अडचणी थोपवून धरता येतात. असंच एक काम तुम्ही 28 फेब्रुवारीआधी करुन घेणं अपेक्षित आहे. असं न केल्यास तुम्हालाच यामुळं आर्थिक नुकसान होऊ शकतं. 

मुख्य म्हणजे आर्थिक नुकसान कोणालाही न परवडणारं असंच असतं. त्यामुळं ही बातमी तुमच्यासाठी. 

ही बातमी आहे पेंशन लाभार्थी अर्थात निवृत्तीवेतन धारकांसाठी. ठरलेल्या तारखेपर्यंत म्हणजेच 28 फेब्रुवारीपर्यंत निवृत्तीवेतन धारकांनी त्यांचा हयातीचा दाखला सादर करणं बंधनकारक असेल.  (Jeevan Pramaan Patra) 

असं न केल्यास निवृत्तीवेतन रोखून धरण्यात येईल. हयातीचा दाखला सादर केल्यानंतरच पेंशनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

केंद्र सरकारकडून निवृत्तीवेतन धारकांनी त्यांच्या हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत वाढवून ही तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पुढे नेली. सहसा ही तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असते. 

कोरोना काळादरम्यान आलेल्या अडचणी पाहता ही तारीख इतकी पुढे आणली गेली. जाणून घेऊया कसा सादर करता येईल हयातीचा दाखला... 

तुम्ही हयातीचा दाखला (Life Certificate) https://jeevanpramaan.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करु शकता. यासाठी तुम्हाला जीवन प्रमाण अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. 

यासाठी UDAI कडून मान्यताप्राप्त फिंगरप्रिंट डिवाईस असणं अपेक्षित असेल. ज्या माध्यमातून स्मार्टफोनद्वारे ईमेल आयडी आणि अॅपमध्ये सांगण्यात आल्यानुसार तुम्ही घरबसल्या हे प्रमाणपत्र जमा करु शकता. 

पेंशनर्स इंडियन बँक्‍स एसोसिएशन (IBA) च्या अंतर्गत 12 शासकीय बँकांमध्ये डोअरस्टेप बँकिंगच्या मदतीने हे प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. 

यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. 

पेंशन अर्थात निवृत्तीवेतन धारकांना दरवर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत आपआपल्या बँक शाखेमध्ये जाऊन हयातीचा दाखला सादर करावा लागतो. 

सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील इतरांना निवृत्तीवेतन मिळू शकण्यासाठी ही प्रक्रिया मदतीची ठरते.