तू जीव का देत नाहीस?; पतीच्या निधनानंतर सुनेला सासूचे रोज टोमणे, अखेर...

In Laws Force daughter In Law For Sati Pratha: पतीचे निधन झाल्यानंतर एकट्या पडलेल्या महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी तिचा मानसिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने टोकाचा निर्णय घेतला आहे. 

Updated: May 25, 2023, 03:01 PM IST
तू जीव का देत नाहीस?; पतीच्या निधनानंतर सुनेला सासूचे रोज टोमणे, अखेर...  title=
in laws force daughter in law for sati pratha after son death later she jump in river

Force daughter In Law For Sati Pratha: आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन आपली ओळख निर्माण करत आहेत. देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे लोटली अलीकडेच आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा केला. मात्र तरीही अनेकदा मन विचलित करणाऱ्या बातम्या समोर येत असतात. सती प्रथा बंद होऊन काळ लोटला तरी अजूनही लोकांवर या प्रथीचा पडगा आहे. पतीच्या निधनानंतर सासरच्यांनी महिलेला सती जाण्यास भाग पाडले. महिलेने नकार देताच तिचा छळ करण्यात आला. अखेर या रोजच्या त्रासाला वैतागून तिने अखेर टोकाचा निर्णय घेतला आहे. 

संगीता लाखरा असं या महिलेचे नाव आहे. ती मुळची राजस्थानची असून ती तिच्या पतीसोबत गुजरात येथे राहत होती. पतीच्या निधनानंतर सासरची मंडळी तिचा शारिरक आणि मानसिक छळ करत होते. पतीच्या निधनानंतर तू सती का गेली नाहीस म्हणत सतत तिला टोमणे मारत होते. सासरच्या मंडळीचा रोजच्या त्रासाला वैतागून अखेर संगीताने साबरमती नदीत उडी घेत आपले जीवन संपवले आहे. 

दोघांच्या नावावर होते घर

महिलेच्या पतीने गुजरातमध्ये स्वतःच घर खरेदी केले होते. ते घर दोघांच्याही नावावर होते. त्याच घरात दोघे पती-पत्नी राहत होते. त्यानंतर काही दिवसांतच पतीचा मृत्यू झाला व महिला एकटी पडली. पतीचा आधार गेल्याने खचलेल्या महिलेला सासरची मंडळी रोज छळत होते. 

सांगलीत जेवण बनवण्यावरुन वाद, बायकोने नवऱ्यावर केले सपासप वार; जागीच मृत्यू

विमा पॉलिसीचे पैसे मिळाले होते

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पतीच्या निधनानंतर महिलेला विमा पॉलिसीचे ५४ लाख रुपये मिळाले होते. तिच्या सासू- सासऱ्यांना पॉलिसीच्या पैशांबाबत कळतात ते तिच्या घरी आले व तिच्याकडून हिस्सा मागू लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पॉलिसीच्या पैशांचे दोन हिस्से करावे. तसंच, महिलेच्या घरावरही त्यांना अधिकार हवा होता. सासू-सासरे नेहमी तिच्यावर या गोष्टीसाठी दबाव आणत होते. तसंच, तिच्या सासूला राहते घर तिच्यावर नावावर करुन हवे होते. 

सती जाण्यासाठी दबाव

महिलेच्या सासरचे लोक महिलेला सती जाण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकत होते. पतीच्या निधनानंतर तु जीव का नाही दिलास? असे टोमणे दिवसातून तीन ते चार वेळा तिला ऐकून घ्यावे लागत असे. रोजच्या टोमण्यांना वैतागून अखेर तिने नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. 

पतीचे करोना काळात निधन, दोन वर्षांनी पत्नीने कबर खोदून काढले अवशेष, कारण... 

गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ते फरार असून पोलिस आरोपींचा कसून तपास करत आहेत.