infosys : भारतातील नामांकित कंपनीने घेतली कर्मचाऱ्यांची परीक्षा; एकाचवेळी 600 जणांची नोकरी गेली

इन्फोसिसने (Infosys) जवळपास 600 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांची फ्रेशर असेसमेंट चाचणी घेतली. या परीक्षेनंतर कंपनीने ही कारवाई केली आहे. 

Updated: Feb 5, 2023, 10:51 PM IST
infosys : भारतातील नामांकित कंपनीने घेतली कर्मचाऱ्यांची परीक्षा; एकाचवेळी 600 जणांची नोकरी गेली title=

infosys Job : भारतात कर्मचारी कपातीचे वारे वाहत असल्यामुळे नोकरदार वर्ग पूर्णपणे हादरला आहे. 65 टक्के लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. एका जॉब पोर्टल इंडिडने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली. आतापर्यंत जगात मंदीची झळ बसून हजारो कर्मचा-यांनी आपल्या नोक-या गमावल्या आहेत. त्यातच आता IT क्षेत्रात खळबळ उडवाणरी घडामोड घडली आहे.  भारतातील नामांकित IT कंपनी इन्फोसिसने (infosys)  कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली. यानंतर एकाचवेळी 600 जणांची नोकरी गेली आहे. 

इन्फोसिसने जवळपास 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांची फ्रेशर असेसमेंट चाचणी घेतली. ही परीक्षा उत्तीर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कंपनीने ही कारवाई केली आहे. यामुळे कर्माचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

एक फ्रेशर कर्मचारी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीत रुजू झाला होता. त्याला सॅप एबीएपी प्रवाहाचे प्रशिक्षण देण्यात आले. 150 जणांच्या टीममधून केवळ 60 जण परीक्षा उत्तीर्ण झाले. बाकी सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले असं या  फ्रेशरने  सांगितले. आठवड्याभरापूर्वीच परीक्षा पास न करु शकणाऱ्या 208 फ्रेशर्स कर्मचाऱ्यांना कंपनीने घरचा रस्ता दाखवला. यानंतर कंपनीने एकाचवेळी 600 फ्रेशर्स कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

सध्या जगभरात सर्वच कंपन्यांमध्ये मोठ्या  प्रमाणात नोकर कपात केली जात आहे. टेक, स्टार्टअप आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याचा सर्वाधिक धोका आहे. कारण याच क्षेत्रात  अनेक कर्माऱ्यांच्या नोकरीवर गदा येत आहे. 
TCS, Infosys आणि Wipro सारख्या देशातील बड्या आयटी कंपन्यांमध्ये केवळ अट्रिशन रेटच कमी झाला नाही, तर कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी प्रमोशन आणि इतर नवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत.

कंपनीचा अ‍ॅट्रिशन रेट कमी झाला

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसचा अॅट्रिशन रेटही कमी झाला आहे. तो 24.3 टक्क्यांवर आला आहे. जे मागील तिमाहीत 27.1 टक्के आणि एप्रिल-जूनमध्ये 28.4 टक्के होते. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 3,46,845 झाली आहे, जी पूर्वी 3,45, 218 होती. 

परदेशातील शेकडो भारतीयांच्या नोक-या धोक्यात?

जगभरात नोकरकपातीची लाट आलीय. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरु झालीय. फेसबुक, ट्विटरनंतर आता अॅमेझॉनही शेकडो कर्मचा-यांना काढण्याच्या तयारीत आहे. मात्र यावेळी भारतातल्या शेकडो कर्मचा-यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.