श्रीनगर : भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई कल्ला करत दहशतवादी तळ उध्वस्त केले. ज्यानंतर या हल्ल्याचं उत्तर देणार असल्याचं सांगत पाकिस्तानकडून हवाई हल्ल्याच्या काही तासांनंतरच भारतीय सीमेजवळ तुफान गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवळपास १२ ते १५ ठिकाणी पाककडून गोळीबार करण्यात येत असून, यामध्ये आतापर्यंत पाच भारतीय जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराचं भारताकडून ही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या हल्ल्यात भारताने पाकिस्तान सैन्याच्या पाच चौक्या उध्वस्त करण्यात यश मिळवलं आहे.
Pakistan troops were also seen firing mortars&missiles from civilian houses using villagers as shields.However,Indian Army targeted Pak posts away from civilian localities. In exchange of fire, our 5 soldiers suffered minor injuries, of which 2 were taken to hospital & are stable https://t.co/Abs2CE2A2m
— ANI (@ANI) February 26, 2019
भारताक़डून आतापर्यंत पाकिस्तानच्या गोळाबाराचं उत्तर देण्यात आलं असून, सीमा भागात असणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. भारत- पाकिस्तान सीमेनजीक असणाऱ्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय सध्या घेण्यात आला आहे. मंगळवारी, २६ फेब्रुवारीलाही दुपारच्या सुमारास पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं तेव्हापासून सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबाराचं सत्र सुरूच आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसाठा सीमेनजीक विविध चौक्यांवर आणला जात असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याचं उत्तर देत असताना भारताच्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याचं नुकसान झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे.
In exchange of fire, 5 soldiers of Indian Army suffered minor injuries out of which 2 soldiers were evacuated to Military Hospital for medical treatment and are in stable condition.
— ANI (@ANI) February 27, 2019
J&K: Pakistan Army violated ceasefire in the Uri sector earlier this morning. More details awaited. pic.twitter.com/ETs6FQqU60
— ANI (@ANI) February 27, 2019
प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानकडून उरी, नौशेरा, अखनूर आणि कृष्णाघाटी, बारामुल्ला, शौपियाँ, राजौरी या सेक्टरमध्ये गोळीबार सुरु झाला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमारेषेवरील तणाव आणखी वाढण्याची चित्र पाहायला मिळत आहेत. २६ फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेच्या 'मिराज २०००' या लढाऊ विमानांच्या सहायय्याने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्य तळासोबतच जवळपास ३००हून अधिक दजहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताकडून झालेल्या या कारवाईची पाकिसत्नला कल्पना नसल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असून, याचं उत्तर योग्य वेळी, योग्य ठिकाणी देणार असल्याचा इशारा पाककडून देण्यात आला.